पुणे, दि. ८ - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ‘रोड शो’बंद गाडीतूनच उरकला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ध्यातच ‘रोड शो’ संपवून टाकल्याने पुण्यातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.
राज ठाकरे यांच्या रोड शोसाठी सकाळपासून कसबा गणपती मंदीर परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता नियोजित वेळ असलेला रोड शो सुरूच बारा वाजता झाला. नंतर शहराच्या मध्य भागातून सुरू झालेला ‘रोड शो’अक्षरश: पळवित नेण्यात आला.
कसबा गणपतीचे दर्शन घेऊन ठाकरे यांनी रोड शोला सुरूवात केली. उघडया गाडीतून ठाकरे फिरणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र प्रत्यक्षात ठाकरे बंद गाडीमध्ये बसले आणि रोड शोला सुरूवात केली. उशिर झाल्याने गाडी वेगाने पुढे जात असल्याने इतर गाडयांची आणि कार्यकर्त्यांची पुरती दमछाक होत होती. खुल्या जिप्सीमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि इतर उमेदवार होते. शोमध्ये महिला आणि तरूणांचा मोठा सहभाग होता.
चौकाचौकांमध्ये घोषणा देऊन, फटाके उडवत, फुले उधळत ठाकरे यांचे स्वागत करण्यात येत होते. हार-तुरे घेण्यासाठीच केवळ राज ठाकरे गाडीच्या काचा उघडत होते. त्यामुळे त्यांची छबी पाहण्यासाठी कार्यकर्त्यांसह अनेक जण उत्सुक होते. रस्त्याच्या कडेच्या इमारतीमध्ये थांबून नागरिक राज ठाकरे यांची छबी टिपण्यासाठी मोबाइल घेवून उभे होते. मात्र राज ठाकरे गाडीतून न निघाल्याने सर्वांची निराशा झाली.
कसबा पेठेतील सुर्या रूग्णालयापासून शोला सुरूवात झाली. साततोटी पोलीस चौकी, नरपतगीरी चौक, संत कबीर पोलीस चौकीमार्गे लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, शाहू चौक मागे जेधे चौकात गेली आणि तेथेच संपली. शहराच्या मध्यवर्ती भागातून रोड शो गेल्याने सगळीकडे वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या सव्वा तासात स्वारगेट येथील जेधे चौकात रोड शो संपला. रोड शोच्या मार्गात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘रोड शो’ नवी पेठ येथून सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भागातून ‘शो’ सुरू करण्यात आला. सकाळी साडे अकरा वाजल्यापासून कार्यकर्ते पवार यांची प्रतिक्षा करत होते. नरवीर तानाजी वाडी, विद्यापीठ परिसर, गोखलेनगर परिसरातून उघड्या जीपमध्ये असलेल्या अजित पवार यांच्यासोबत दुचाकीवरून मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते होते. सेनापती बापट रस्त्यावर हा ‘रोड शो’ अचानक संपविण्यात आला. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या समवेत संयुक्त सभेला उपस्थित राहण्यासाठी पवार मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले.

0 comments:
Post a Comment