Meet your Life Partner

Search Your World

Friday, December 30, 2011

राजधानीत सीएनजी १.७५ रुपयाने महाग

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे, राजधानीला पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस कंपनीने, सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.७५ रुपयांनी वाढ केली आहे. हे दर आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासूनच अंमलात येणार आहेत.

इंद्रप्रस्थ गॅस ही कंपनी दिल्ली आणि शेजारच्या शहरांमध्ये सीएनजी आणि बंद वाहिनीतून घरगुती गॅसचा पुरवठा करते. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये सीएनजीचा प्रति किलो दर ३३.७५ रुपये आणि नॉईडा व गाझियाबादमध्ये ३७.९० रुपयांवर गेला आहे. यापूर्वी कंपनीने १ ऑक्टोबर रोजी दरवाढ केली होती.

इंद्रप्रस्थ गॅसचे व्यवस्थापकीय संचालक एम. रवींद्रन म्हणाले, की रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळेच ही दरवाढ करावी लागली आहे. पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कंपनी जादा दराने गॅसची आयात करते. मूळ पुरवठादार रिलायन्स कंपनीच्या पूर्व किनाऱ्यावरील केजी-डी-६ या प्रकल्पातून नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागली आहे.

0 comments:

Post a Comment