Meet your Life Partner

Search Your World

Friday, February 17, 2012

शिवसेनेनं ठाण्यात 'जिंकून दाखवलं'



ठाण्यात महायुती
ठाण्यात महायुती
ठाणे : ठाणे महापालिकेवर आता महायुतीचाच झेंडा फडकणार, हे स्पष्ट झालं आहे. ठाण्यातल्या १३० जागांचे निकाल घोषित झाले आहेत.
ठाण्यात सेनेनं ५३ तर भाजपनं ८ जागांवर विजय मिळवला.
महायुतीला ठाण्यात महाआघाडीनं जोरदार लढत दिली. राष्ट्रवादीनं काँग्रेसनं ३४ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने १८ जागांवर.
मनसेनं सात जागांवर विजय मिळवला असून अपक्ष आणि इतरांनी १० जागा जिंकल्या आहेत.
ठाण्यात सत्तास्थापनेसाठी ६६ जागांची आवश्यकता आहे. महायुतीनं मिळून ६० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना ६ जागांची गरज आहे. अपक्षांची मदत घेऊन महायुती सत्ता स्थापनेचा दावा करु शकते.

0 comments:

Post a Comment