Meet your Life Partner

Search Your World

Sunday, January 15, 2012

बनावट नोटा दुप्पट महागल्या!

जयेश शिरसाट। दि. १४ (मुंबई)
आंतरराष्ट्रीय विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरत असले तरी बनावट नोटांच्या बाजारात मात्र, रुपया वधारला आहे. पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बनावट नोटा दुप्पट महागल्याने या धंद्यातील व्यक्तींना घाम फुटला आहे, असे पश्‍चिम बंगालमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पश्‍चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हय़ातल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने खास ‘लोकमत’ला ही माहिती दिली. त्यानुसार पूर्वी २५ ते ३0 रुपयांना मिळणारी शंभराची बनावट नोट सध्या ५0 ते ५५ रुपयांना विकली जात आहे. बनावट नोटांविरोधात मुर्शिदाबाद, मालदा, नदीया, चोबीस परगणा या जिल्हय़ातील बांग्लादेश सीमेवरल्या खेड्यांमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईतून ही भाववाढीची बातमी फुटली.
या भाववाढीमुळे बनावट नोट मुंबईत येईपर्यंत ९0 ते ९५ रुपयात पडत असल्याने बनावट नोटांच्या व्यवहारांचे प्रमुख केंद्र असलेल्या पश्‍चिमबंगाल-बांग्लादेश सीमेवर देशी-परदेशी एजंटांमध्ये मोठी ‘बार्गेनिंग’ सुरू
आहे. भाववाढले असले तरी बनावट नोटांचा सुळसुळाट काही थांबण्याचे नाव घेत नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.
सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने बनावट नोटावाल्यांना सुगीचे दिवस आहेत. निवडणुकांत बनावट नोटांची मागणी लक्षात घेऊन बांग्लादेशी एजंटांनी ही भाववाढ केल्याची शक्यता आहे.

0 comments:

Post a Comment