न्यूयॉर्क - घरकाम करणाऱ्या महिलेला गुलामासारखी वागणूक देणे आणि तिचा छळ
करण्याच्या आरोपावरून अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्याला स्थानिक न्यायालयाने
15 लाख डॉलरचा दंड ठोठावला. मानसिक छळ करण्यासाठी पाच लाख डॉलरचा दंड
करण्यात आला. नीना आणि जोगेश मल्होत्रा असे त्या दांपत्याचे नाव आहे.
त्यांच्या घरी काम करणाऱ्या शांती गुरुंग या तरुणीचा व्हिसा आणि पासपोर्ट
जप्त करून, पगारही न देता तिचा छळ केल्याचा आरोप या दांपत्यावर आहे.
नीना मल्होत्रा पूर्वी न्यूयॉर्कमधील भारतीय उच्चायुक्तालयात माध्यम संयोजनाचे काम करत होत्या. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयासाठी भारतात काम करतात. मल्होत्रा दांपत्याने न्यूयॉर्कमध्ये असताना दैनंदिन घरकामासाठी गुरुंग या तरुणीला 2006 मध्ये अमेरिकेला आणले व 108 डॉलरचा पगार देऊ, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र गुरुंगला गुलामासारखे काम करावे लागले, असे मॅनहॅटनमधील दंडाधिकारी न्यायालयाने म्हटले आहे. गुरुंगला दिवसाचे सोळा तास काम करावे लागले, शिवाय नीना यांना रोज मसाज करण्यासारखे कामही तिच्याकडून करवून घेतले गेले. तीन वर्षांत गुरुंगचे वजन साठ पौंडांनी खाली आले, असे न्यायालयाने म्हटले.

0 comments:
Post a Comment