जयपूर - ब्रिटनमधील वादग्रस्त आणि भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांनी आपला नियोजित भारत दौरा आज (शुक्रवार) रद्द केला. सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी हा दौरा रद्द केल्याचे समजते.
जयपूरच्या वार्षिक साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सलमान रश्दी उपस्थित राहणार होते. मात्र त्यांच्या भारत दौऱ्याला काही मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे त्यांना साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले जाणार नाही, असे संमेलनाच्या संयोजकांनी जाहीर केले होते. आता त्यांनीच भारत दौरा रद्द केल्याची माहिती संयोजकांनी जाहीर केली आहे. त्यांनी पाठविलेले पत्र संयोजकांनी वाचून दाखविले आहे. रश्दी म्हणतात,""सध्याच्या परिस्थितीत भारत दौरा करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.''
रश्दी यांच्यावर आत्मघातकी हल्ला होऊ शकतो, अशी माहिती भारतीय गुप्तहेर खात्याला मिळाली होती.

0 comments:
Post a Comment