Meet your Life Partner

Search Your World

Monday, December 26, 2011

अण्णांना काँग्रेसचा सबुरीचा सल्ला

ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अशक्त लोकपाल विरोधातील उपोषणाच्या पुर्वसंध्येला सरकारने त्यांना सबुरीचा सल्ला दिला.
संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला म्हणाले की, अण्णांनी आपले आंदोलन सुरु करण्यापूर्वी संसदेत होणार्‍या चर्चेच्या निष्कर्षाची प्रतिक्षा करायला हवी. सर्वांनी लोकपालाचा निर्णय संसदेवर सोडायला पाहिजे कारण यावेळी ते संसदेच्या कार्यक्षेत्रात आहे. सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. प्रत्येक जण यावर मंथन करीत आहे. संसदच विधेयकाचे भाग्य निश्‍चित करेल, असा दावा करताना शुक्लांनी अण्णांना संसदेच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, काँग्रेसने अण्णा हजारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांवर नवा पवित्रा घेतला आहे. संघाशी संबंध असल्याचा आरोप अण्णांवर होताच भाजप त्यांच्या बचावासाठी पुढे का सरसावते? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. पक्ष प्रवक्ते राशिद अल्वी म्हणाले की, जेव्हाही अण्णांचा दृष्टीकोन भाजप व संघासारखा असल्याचा आरोप होतो तेव्हा हेच त्याचे स्पष्टीकरण देतात. अण्णा तसेच संघ यांच्यातील या समीकरणामुळे मी अचंबित होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.



Source : http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-26-12-2011-17959&ndate=2011-12-27&editionname=main

0 comments:

Post a Comment