Meet your Life Partner

Search Your World

Wednesday, July 13, 2011

यूपीएसीसाठी स्मार्टवर्कही हवं

परीक्षांमध्ये लक्षवेधी कामगिरी न करणारे विद्याथीर्सुद्धा सिव्हिल सव्हिर्सेसमध्ये जाऊ शकतात. कठोर मेहनत आणि नियोजनपूर्वक अभ्यास करून आयएएस आणि आयपीए
स होणं अवघड नाही, अशी माहिती मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त वाय. सी. पवार आणि 'फोर्स वन'चे डेप्युटी पोलीस कमिशनर डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

' महाराष्ट्र टाइम्स प्रगती फास्ट' आणि 'वेधश्री आयएएस अॅकेडमी' तफेर् झालेल्या सेमिनारमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यूपीएससीतील यशस्वी ऋग्वेद ठाकूर आणि अश्विनी आडिवरेकर यांनीही आपले अनुभव यावेळी शेअर केले. नागरी सेवांमध्ये काम करताना निर्णयक्षमतेचा कस लागतो. ज्ञानापेक्षा तुमच्या प्रभावी सादरीकरणाला महत्त्व असतं, असं पवार यांनी सांगितलं.

' मुलं रानफुलं आहेत. त्यांना खत-पाणी द्या. स्वत:ची स्वप्न त्यांच्यावर लादू नका', असं आवाहनही डॉ. राठोड यांनी पालकांना केलं. यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या गुणांचं आणि चुकांचं विश्लेषण करा, असा सल्ला ऋग्वेद ठाकूरने दिला. तर, यूपीएससीमध्ये हार्डवर्कबरोबरच स्मार्टवर्क करावं लागतं. आधी प्रश्ान् बघा आणि नंतर तयारी करा, अशी खास टीप अश्विनीने दिली. यावेळी ऋग्वेद आणि अश्विनी यांच्या हस्ते अॅकेडमीच्या वेबसाइटचं उद्घाटन करण्यात आलं.

0 comments:

Post a Comment